शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 18:59 IST

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदीदरम्यान विमानाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी कमिशनही घेतलं होतं, असा आरोपही सिब्बल यांनी केला आहे. व्हिडीओत सिब्बल म्हणतात, नोटाबंदीनंतर भाजपा नेत्यांनी 15 टक्क्यांपासून 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून दिल्या होत्या. सिब्बल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजपाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिब्बल म्हणाले, नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. ज्या टीमचं नेतृत्व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. या टीममध्ये वेगवेगळ्या विभागातील अधिकारी होते. मंत्री आणि व्यावसायिकांचे पैसे विमानाच्या माध्यमातून हिंडन एअरबेसवर आणण्यात आले. तिकडून ते रिझर्व्ह बँकेत जमा केले गेले. त्या जुन्या नोटा 35 ते 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन बदलण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आपली यंत्रणा ही विरोधकांच्या हात धुऊन मागे लागली आहे.ही दुःखद गोष्ट आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या घरी कोणताही छापा पडत नाही. सिब्बल यांनी मध्य प्रदेशमध्ये पडलेल्या छाप्यांचाही हवाला दिला आहे. मोदी सरकारनं नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा केला असून, गेल्या पाच वर्षांत पाण्यासारखा पैसा वाया घालवला आहे. बँकर, सरकारी कर्मचारी आणि सरकारनं मिळून 15 ते 40 टक्क्यांपर्यंत कमिशन कमावले असल्यास यासारखा मोठा गुन्हा नाही. हा देशद्रोह आहे. यंत्रणा फक्त विरोधी पक्षांची चौकशी करत आहे. परंतु मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची कोणतीही चौकशी होत नाही. असं वाटतं ईडी, सीबीआय आणि एएनआय मोदी सरकारच्या ताब्यात आहेत. आता लोकशाही वाचवण्याचं काम जनतेचं आहे, असंही कपिल सिब्बल म्हणाले आहेत. 

टॅग्स :Note Banनोटाबंदीcongressकाँग्रेस