शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:46 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे.

आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. गोलाघाटमध्ये एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही. न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.न्याय योजनेसाठी त्या चोरांच्या खिशातूनच पैसे येणार आहेत, ज्यांना मोदी वाचवत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ईशान्य भारतावर हल्ला होऊ देणार नाही. एकीकडे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं मोदी सरकारनं खोटं आश्वासन दिलं, तर दुसरीकडे काँग्रेस पार्टीनं तुम्हाला  72 हजार रुपये देण्याचं खरं आश्वासन दिलं आहे. भारतातल्या 20 टक्के गरीब लोकांच्या खात्यात काँग्रेस पाच वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये खात्रीशीररीत्या जमा करणार आहे. मोदींनी पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना बेरोजगार केलं आहे.सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. परंतु त्यातील कोणतंही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेलं आहे काय?, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अद्यापही पूर्ती केलेली नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यास महिन्याकाठी 12 हजारांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांची एक यादी तयार केली जाईल, त्या सर्वांच्या खात्यात काँग्रेस सरकार 72 हजार जमा करणार आहे. देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात. परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आमचं सरकार आल्यावर कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAssam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019