शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha elections 2019: दिल्लीतील उमेदवारांमध्ये गौतम गंभीर श्रीमंत, संपत्ती वाचून डोळे चक्रावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 11:54 IST

Lok Sabha elections 2019: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर राजकारणाच्या खेळपट्टीवर आतषबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

नवी दिल्ली, लोकसभ निवडणूक 2019 : क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर राजकारणाच्या खेळपट्टीवर आतषबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय जनता पक्षानं त्याला पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. दिल्लीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या अन्य उमेदवारांना गंभीरने आधीच चीतपट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विविध पक्षांचे मिळून 349 उमेदवार उभे आहेत आणि त्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंभीरने मान पटकावला आहे. उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 12 कोटींची वाढ झाली आहे.  दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगकडे 12.14 कोटींची संपत्ती आहे. विजेंदरने 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.  मंगळवारी 164 उमेदवारांनी अर्ज भरला. त्यात काँग्रेसच्या सात, तर भाजपाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019Gautam Gambhirगौतम गंभीर