शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 4:56 PM

राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इराणींचं शरसंधान

अमेठी: वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी निशाणा साधला. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे अशा शब्दांमध्ये इराणींनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका केली. राहुल गांधींनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न विचारत एकेकाळचे त्यांचे साथीदार त्यांच्यापासून दुरावल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणींनी विचारला. 'महाआघाडीनं त्यांची साथ सोडली. ममताजी त्यांना महत्त्व देत नाहीत. डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. ज्यांच्यासोबत त्यांनी सत्तासुख भोगलं, ते सर्वच आज राहुल गांधींपासून दूर गेले आहेत. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे,' अशी घणाघाती टीका इराणींनी केली. राहुल गांधींनी आज केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावरुन इराणींनी राहुल यांना लक्ष्य केलं. राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरुन अमेठीतील जनतेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं. 'राहुल गांधी अमेठीत अपयशी ठरल्यानंतर आता वायनाडमधील जनतेला फसवण्यासाठी जात आहेत. त्यांना अमेठीचा विकास करता आला नाही. इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना कराला लागत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र राहुल यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही,' अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्यातील न्याय योजनेवरदेखील स्मृती इराणींनी तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसला जाहीरनामा तयार करता येत नाही. राहुल गांधींची न्याय योजना गरिबांची फसवणूक आहे. अमेठीतील जनता यंदा भाजपाला मतदान करणार नाही. प्रियंका गांधींच्या राजकारणातील आगमनानं कोणताही फरक पडणार नाही. त्यांच्या प्रचारामुळे परिस्थितीत जराही बदल होणार नाही,' असंदेखील स्मृतींनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणी