शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 18:49 IST

दिल्लीत काँग्रेस-आपचं ठरेना

नवी दिल्ली: गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र या आघाडीला मूर्त स्वरुप आलेलं नाही. याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एक ट्विट केलं आहे. आपसाठी दिल्लीत 4 जागा सोडायला तयार असल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यू टर्न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 

'आप आणि काँग्रेसनं आघाडी केल्यास दिल्लीत भाजपाचा पराभव होऊ शकतो. काँग्रेस आपसाठी 4 जागा सोडण्यास तयार आहे. पण केजरीवालांनी पुन्हा एकदा घूमजाव केलं आहे. आमचे दरवाजे आताही उघडे आहेत. पण वेळ निघून चालली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आप आणि काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरू झाल्यानंतर राहुल यांनी प्रथमच यावर जाहीर भाष्य केलं. आप आणि काँग्रेसमध्ये निष्फळ ठरणाऱ्या चर्चांचं खापर राहुल यांनी केजरीवालांवर फोडलं. भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपला दिल्लीबाहेरदेखील काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. दिल्लीबाहेर 18 जागा मिळाव्यात, अशी आपची मागणी आहे. पंजाब, हरयाणा आणि छत्तीसगडमध्ये आघाडी करण्यास आप उत्सुक आहे. तर काँग्रेसला आपसोबत केवळ दिल्लीतच आघाडी करायची आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. या सातही जागा भाजपानं गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा