शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

मोदींकडून गटार पातळीचं राजकारण; अहमद पटेल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:04 IST

अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली

नवी दिल्ली: अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधल्या जनसभेत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या या टीकेला पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'नरेंद्र मोदींना सगळे ओळखतात. ते गटार पातळीचं राजकारण करतात,' अशा शब्दांमध्ये पटेल यांनी मोदींवर शरसंधान साधलं. मोदींची भाषा एखाद्या सरपंचाचीसारखी असल्याचंदेखील पटेल म्हणाले.मोदींनी आज उत्तराखंडमधील जनसभेत बोलताना अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन गांधी कुटुंब आणि अहमद पटेल यांना लक्ष्य केलं. अगुस्ता प्रकरणातील आरोपपत्रात पटेल यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं मोदी म्हणाले. या टीकेला अहमद पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं. 'नरेंद्र मोदींना सगळे ओळखतात. ते गटार पातळीचं राजकारण करतात. ते एखाद्या गावाच्या सरपंचासारखे बोलतात. त्यांच्याकडून महापालिका स्तरावरचं राजकारण सुरू आहे,' असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं. त्याआधी आज मोदींनी उत्तराखंडमधील जनसभेत अगुस्ता वेस्टलँडवरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. चौकीदारानं हेलिकॉप्टर घोटाळ्यातील काही दलालांना दुबईहून भारतात आणलं. यानंतर इटलीच्या मिशेल मामा आणि इतर मध्यस्थांची चौकशी झाली, असं मोदी म्हणाले. 'या प्रकरणाच्या आरोपपत्रात एपी आणि फॅम असा असा उल्लेख आहे. यातील एपीचा अर्थ अहमद पटेल आणि फॅमचा अर्थ फॅमिली असा होतो. आता अहमद पटेल कोणत्या फॅमिलीचे निकटवर्तीय आहेत, हे तुम्हीच मला सांगा,' असं म्हणत मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. 'ज्या कुटुंबाची विमानतळावर कोणीही चौकशी करत नव्हतं, ज्यांना सर्वजण सलाम करायचे, ते आज जामीनावर आहेत. जे स्वत:ला देशाचे भाग्यविधाते समजत होते, ते आज तुरुंगवारी टाळण्याचे प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAhmed Patelअहमद पटेलNarendra Modiनरेंद्र मोदी