शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:43 PM

लवकरच भाजपात प्रवेश करणार

मुंबई: काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता कोळंबकर यांनी थेट युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज कोळंबकर यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. महिन्याभरापूर्वीच कालिदास कोळंबकर त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरुन चर्चेत आले होते. कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकावरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दल बोलताना मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही. काँग्रेसमधून मला बाहेर करण्यात आलं, असं कोळंबकर यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यावर विभागातल्या कट आऊटवरुन माझा फोटो काढण्यात आला. मग मी त्यांचे फोटो माझ्या बॅनरवर का लावू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.जनतेला लोकप्रतिनिधींकडून कामं हवी आहेत. जी व्यक्ती कामं करुन देते, जनता त्याच्याच पाठिशी उभी राहते. मुख्यमंत्री प्रलंबित कामं मार्गी लावतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं, तर त्यात गैर काय?, असा प्रश्न कोळंबकर यांनी विचारला. कोळंबकर यांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त केला. कोळंबकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळाल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिणKalidas Kolambkarकालीदास कोळंबकरRahul Shewaleराहुल शेवाळेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना