शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मला साथ द्या, नाहीतर...; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:31 IST

मेनका गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

सुलतानपूर: भाजपा खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं आहे. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा काम उद्या माझ्याकडे एखादं काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून जा, असं मेनका गांधी यांनी म्हटलं. सुलतानपूरमधील एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री असलेल्या मेनका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुस्लिमबहुल तुराबखानी भागातील प्रचारसभेत त्यांनी उपस्थितांना जवळपास धमकीच दिली. 'मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही खुल्या मनानं आलो आहोत. उद्या तुम्हाला माझी गरज लागेल. त्यामुळे तुम्ही आताच पाया रचून ठेवा. हीच योग्य वेळ आहे,' अशा शब्दांमध्ये मेनकांनी मुस्लिमांना धमकावलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी निवडून आले, तर तुमची कामं करणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारादेखील मेनका यांनी दिला. 'माझ्या फाऊंडेशननं तुमच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र जेव्हा निवडणूक येते, तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. मी तर निवडणूक जिंकले आहे. मात्र हा विजय तुमच्याशिवाय कडू आहे. त्यामुळेच जेव्हा निकाल लागेल आणि तुमच्या बूथवरुन 50 किंवा 100 मतं येतील. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे कामासाठी याल, तेव्हा समजून जा,' अशी धमकी मेनकांनी दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsultanpur-pcसुल्तानपुरUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Maneka Gandhiमनेका गांधीBJPभाजपाMuslimमुस्लीम