शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:02 IST

वादग्रस्त विधानाबद्दल निवडणूक आगोगाची मेनका गांधींना नोटीस

सुलतानपूर: भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या विधानानं वादात अडकल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावल्यानंतर त्या स्वत:च्याच आयटी सेलवर भडकल्या. आमच्या आयटी सेलला काळजी घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. संतापलेल्या मेनका यांनी आयटी सेलची गरज आहे का, असा सवालदेखील उपस्थित केला. मी लिहिलेलं वाचून दाखवत नाही. मी जे काही बोलले, ते मनापासून बोलले, असं मेनका गांधींनी म्हटलं. 'मी भाषणं पाठ करून येत नाही. मी प्रचारसभेत त्यांच्याबद्दल (मुस्मिम मतदारांबद्दल) जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवण्यात आलं, ते पूर्णपणे वेगळं होतं. मी अशी नाही. मुस्लिम बांधव आमच्यासोबत यावेत, यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करते आहे,' असं मेनका म्हणाल्या. या प्रकरणात आमच्या आयटी सेलनं काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आयटी सेलनं ना माझं भाषण घेतलं ना काही केलं. त्यामुळे अशा आयटी सेलची खरंच गरज आहे का असा प्रश्न मला पाडतो, असा संताप मेनका गांधीनी व्यक्त केला. आयटी सेलवाले दिवसभर फोटो क्लिक करतात. ते फोटो अपलोड करतात. अशा पद्धतीनं निवडणूक होऊ शकत नाही, असं मेनका गांधी म्हणाल्या. मेनका गांधी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्या वादात सापडल्या. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादं काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून जा, असं मेनका गांधी यांनी म्हटलं. सुलतानपूरमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्याबद्दल निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019sultanpur-pcसुल्तानपुरManeka Gandhiमनेका गांधीMuslimमुस्लीमBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग