शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Lok Sabha Election 2019: बेगुसरायचा पाकिस्तान होऊ देणार नाही- गिरीराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 08:48 IST

गिरीराज सिंह यांच्यासमोर कन्हैया कुमारचं आव्हान

पाटणा: बेगुसरायचा पाकिस्तान होणार नाही, असं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. काही जणांकडून बेगुसरायचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा फणा ठेचण्यासाठी पक्षानं आपल्याला उमेदवारी दिल्याचं सिंह म्हणाले. बिहारमधील पाच जागांवर आज मतदान होत आहे. यातल्या बेगुसराय मतदारसंघातील लढतीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी गिरीराज सिंह यांच्याकडे आव्हान उभं केलं आहे. कन्हैया कुमार सीपीआयकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंदूंना शिव्या देणाऱ्या, हिंदू गोमांस खातात अशी बेताल विधान करणाऱ्यांना हिंदू सहन करणार नाहीत. हिंदू हा अपमान सहन न करता असे विषारी फणे ठेचून काढेल, असं गिरीराज सिंह म्हणाले. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी आज काल काही जण हिंदूंना शिव्या देतात. वंदे मातरमवरुनही देशात वाद होतो. देशातील प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम म्हणायला हवं. मग ती व्यक्ती हिंदू असो वा मुस्लिम. एखादी व्यक्ती वंदे मातरम म्हणत नसेल, तर देशातली जनता त्या व्यक्तीला माफ करणार नाही, असंदेखील गिरीराज यांनी म्हटलं. गिरीराज यांनी सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांनाही लक्ष्य केलं. कन्हैया कुमार तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत. ते देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप गिरीराज यांनी केला. यावेळी त्यांनी महाआघाडीवरही निशाणा साधला. महाआघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही.मात्र एनडीएकडे नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार आहे, असं गिरीराज म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019begusarai-pcबेगूसरायBJPभाजपाkanhaiya kumarकन्हैय्या कुमार