शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:49 IST

काश्मीरमधील सुरक्षा दलांच्या कारवाईचा उल्लेख करत मोदींचा सवाल

लखनऊ: दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसभेला संबोधित करताना विचारला. दहशतवादी बॉम्ब, बंदूक घेऊन समोर उभे असताना जवानांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन गोळ्या घालण्यासाठी परवानगी मागायची का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. ते उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बोलत होते.लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातल्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आलेल्या मोदींनी जनसभेला संबोधित करताना आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात कारवाईचा संदर्भ दिला. आज सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. मोदींनी त्यांच्या भाषणात या कारवाईचा उल्लेख केला. 'काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचं आज सकाळीच समजलं. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारलं. दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीरमध्ये सतत स्वच्छता अभियान सुरू असतं. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणं माझं काम आहे, अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला. भगवान श्रीरामाचं नाव घेतल्यानं तुरुंगात टाकणाऱ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचं आवाहन मोदींनी केलं. तुमचं मत माझ्यासाठी गरजेचं आहे. पवित्र आणि अमूल्य आहे, असं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019kushi-nagar-pcकुशी नगरNarendra Modiनरेंद्र मोदीterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग