शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:50 IST

राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका गुलदस्त्यात; काँग्रेस नेत्यांचाही सावध पवित्रा

- सागर गुजर सातारा : राष्ट्रवादीमधील अंतर्गत विरोध झुगारून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पवारांच्या आदेशानुसार उदयनराजे व राष्ट्रवादीच्या आमदारांतील मतभेदांना विराम मिळाला, तरी मनभेद कायम असल्याचे चित्र आहे.विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पक्षाचे प्राबल्य असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा काँगे्रसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी पराभव केला. या निवडणुकीपासूनच उदयनराजेंविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते असा उभा दावा जिल्ह्यात निर्माण झाला. तसेच सातारा नगरपालिका निवडणुकीवेळी नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या वेदांतिकाराजे भोसलेंच्या पराभवाची सल अजून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनात आहे.नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे यांनी ‘उदयनराजेंना लोकसभेच्या प्रचारासाठी राज्यभर फिरवा... सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करू,’ असे जाहीरपणे सांगितले होते. पण विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी उदयनराजेंच्या बाजूने जाहीरपणे भूमिका मांडलेली नाही.पृथ्वीराज चव्हाण यांचेही प्रतिकूल मतकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उदयनराजेंबाबत मळभ असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी कºहाडाच्या काँगे्रस मेळाव्यात स्पष्ट केले. तर ‘अगोदर सगळी राष्ट्रवादी उदयनराजेंसोबत जाऊ द्या, मग आपण त्यांच्यासोबत जाऊ,’ असे स्पष्टीकरण आमदार जयकुमार गोरे यांनी केले. या परिस्थितीत उदयनराजे स्वकियांचे चक्रव्यूह कसे भेदतात, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस