शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:20 IST

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली- बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपानं त्यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असून, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.या मुद्द्यावरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनीही काँग्रेसच्या आडून शत्रुघ्न सिन्हांना लक्ष्य केलं आहे. फेसबुकवर त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉगमध्ये जेटली लिहितात, भाजपाच्या काही नावाजलेल्या चेहऱ्यांना काँग्रेसनं बक्षीस म्हणून स्वीकारलं आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे आभार मानतो, कारण काँग्रेसनं आमच्या डोक्याला ताप झालेले शत्रुघ्न सिन्हांना त्यांच्या पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांसाठी काही गोष्टी चांगल्या नाहीत. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला कोणत्याही राज्यात इतर पक्षांशी अर्थपूर्ण आघाडी करण्यात यश आलेलं नाही.तसेच त्यांनी विरोधकांच्या गठबंधनला सर्कशीची उपमा दिली आहे. महागठबंधन पहिल्यांदाच अपयशी झालं आहे. कारण तिसऱ्या टप्प्यातील नामांकनंही अंतिम टप्प्यात आली आहे. गठबंधनजवळ कोणीही नेता नाही किंवा कोणतीही योजना नाही. त्यांचे विचारही जुळत नाही. त्यांना वाटतं की, अराजक परिस्थिती निर्माण करून सत्ता प्राप्त करता येऊ शकते. पण तसं कधीच होऊ शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत.     

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक