शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिवसेनेनं स्वबळाचा नारा खरा 'करून दाखवला'; या राज्यात 'एकला चालो रे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:31 IST

15 लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र लढणार

कोलकाता: भाजपा आणि शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या गुजरातमधील रोड शोला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा उद्या गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करुन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यातील 48 जागांवर शिवसेना-भाजपानं युती केली असली, तरी पश्चिम बंगालमध्ये शिवसेना स्वबळ आजमावणार आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 15 जागांवर शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 जागा लढवल्या होत्या. मात्र याआधी कधीही शिवसेनेनं पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. मात्र यंदा शिवसेनेनं कोलकाता दक्षिण, जादवपूर, बसिरहाट, बारासात, डमडम, बराकपूर, पुरालिया, बिष्णूपूर, मेदिनीपूर, कांठी, उत्तर माल्दा, बिरभूम आणि मुर्शिदाबाद या लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर हिंदू उमेदवारच दिले जाणार आहेत. राज्यातील भाजपा तृणमूलयुक्त असल्याचा टोला शिवसेनेचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अशोक सरकार यांनी केला. 'शारदा, नारदा घोटाळ्यातील आरोपी असलेले तृणमूलचे नेते भाजपात दाखल झाले आहेत. मुकूल राय, संकूदेब पांडा यांची सीबीआयकडून चौकशीदेखील झाली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला,' असं सरकार म्हणाले.  भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेत आली. मात्र आता त्यांना त्याच विषयाचा विसर पडल्याची टीका सरकार यांनी केली. 'त्यांना आता हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे बंगालमध्ये आमचा लढा हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. यासाठी आम्ही राज्यात भाजपा आणि तृणमूलविरोधात लढणार आहोत,' असं सरकार म्हणाले. मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हणत ममता बॅनर्जींनी ग्रामीण भागात काही चांगली कामं केल्याचं सरकार यांनी सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेनाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा