पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 10:10 AM2019-04-28T10:10:22+5:302019-04-28T10:10:50+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षातील तीन नावांना पसंती दर्शवली आहे.

lok sabha election 2019 sharad pawar backs mamata mayawati and chandrababu naidu for pm post | पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन

पवारांनी पीएमपदासाठी राहुल गांधी नव्हे, तर 'या' तीन नेत्यांना दिलं समर्थन

Next

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षातील तीन नावांना पसंती दर्शवली आहे. पवारांनी एका टीव्ही चॅनेलनं दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केलं आहे. पवारांनी पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्या नावांना समर्थन दिलं आहे. जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आल्यास हे तीन नेते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात. या तिन्ही नेत्यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असल्याचाही उल्लेख पवारांनी केला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे हे तिन्ही नेते राज्यांचे मुख्यमंत्री राहिले होते. पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान बनण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माझ्या मते एनडीएला बहुमत मिळवण्यात अपयश आल्यास ममता, नायडू आणि मायावती पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. तसेच ममता यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनाही पाठिंबा देऊ शकते, असंही पवार म्हणाले आहेत.


परंतु पवारांना आपल्या यादीत राहुल गांधींचं नाव न ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींनी अनेक वेळा सांगितलं आहे की, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, याचा उल्लेखही पवारांनी केला आहे. पण हे तिन्ही नेते राहुल गांधींपेक्षा चांगले पंतप्रधान ठरू शकतात का, असा विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी मौन साधलं.

चंद्राबाबूंनी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याचीच तेलुगू देसम पार्टीची प्राथमिकता असल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी पंतप्रधानांच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी अमेठीमध्ये सांगितलं होतं की, काँग्रेस लोकसभा निवडणूक जिंकल्यास राहुल गांधी पंतप्रधान होतील. डीएमके नेते स्टॅलिन, जेडीएस नेते देवेगौडा आणि राजद नेते तेजस्वी यादव राहुल गांधींनी पंतप्रधान बनावं, यासाठी समर्थन दिलं आहे. 

Web Title: lok sabha election 2019 sharad pawar backs mamata mayawati and chandrababu naidu for pm post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.