शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:53 IST

राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

अमेठी: लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीवासीयांना पत्र लिहिलं आहे. अमेठी माझं कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीशी माझं भावनिक नातं आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्यांचं जसं एकमेकांशी नातं असतं, तसंच नातं माझं आणि अमेठीतल्या जनतेचं असल्याचं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजपाकडून असत्याचा प्रचार केला जात असून केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं टीकास्त्र राहुल यांनी सोडलं. अमेठीवासीयांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे राफेलचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसची मालक जनता आहे. तर भाजपाचे मालक अनिल अंबानी आहेत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी राफेलचा प्रत्यक्ष उल्लेख न करता भाजपावर शरसंधान साधलं. 'काँग्रेस पक्ष गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. पण भाजपाला केवळ 15 ते 20 उद्योगपतींना सरकारचं मालक करायचं आहे. देशात काँग्रेसचं सरकार येताच अमेठीतली थांबलेली विकासकामं पुन्हा सुरू होतील,' असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. राहुल यांनी त्यांच्या पत्रातून अमेठीवासींयाना भावनिक साद घातली. 'अमेठी माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब मला धैर्य देतं. त्याचमुळे मी सत्याच्या बाजूनं उभा आहे. गरीबांच्या व्यथा ऐकतो आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवतो आहे. तुम्ही मला प्रेमाची शिकवण दिली आहे. त्यामुळेच मी देशाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे,' असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रातून त्यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. 'भाजपाची मंडळी निवडणुकीवेळी खोटारडेपणाचा कारखाना सुरू करतात. पैशांच्या नद्या वाहतात. पण त्यांना अमेठीच्या ताकदीची कल्पना नाही. खरेपणा, स्वाभिमान आणि साधेपणा हेच अमेठीवासीयांचं सामर्थ्य आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपा