शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 10:39 IST

अमेठीत राहुल गांधींना मोहम्मद हारुन रशिद देणार आव्हान

अमेठी: काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोहम्मद हारुन रशिद यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिद यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्यांपासून काँग्रेसचं कट्टर समर्थक असल्यानं अमेठीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधींविरोधात शड्डू ठोकणारे रशिद काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. अमेठीचा पुरेसा विकास न झाल्याचा दावा करत रशिद यांनी निवडणुकीच्या रिंगणात राहुल यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद हारुन रशिद यांचे वडील मोहम्मद सुलतान राहुल गांधींचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींचे अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच रशिद यांनी राहुल गांधींविरोधात दंड थोपटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल यांच्या आधी राजीव गांधी आणि सोनिया गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या उमेदवारी अर्जांवर हारुन यांचे वडील सुलतान यांनी स्वाक्षरी केल्या होत्या. राहुल गांधींच्या काळात अमेठीचा विकास न झाल्याचा आरोप रशिद यांनी केला. 'काँग्रेसच्या कथनी आणि करनीमध्ये मोठा फरक आहे. याचं मूर्तीमंत उदाहरण अमेठीत पाहायला मिळतं. अमेठीत कोणीही आलं, तरी लगेचच त्यांना या भागातील परिस्थितीत लक्षात येईल. अमेठीत विकासकामं झालेली नाहीत. अमेठीतील जनतेला चांगलं भविष्य मिळावं यासाठी मी निवडणूक लढवतो आहे,' असं रशिद यांनी सांगितलं. हारुन यांचे वडील सुलतान काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. '1910 मध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला. तरुण असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आमचं कुटुंब 70 वर्षांपासून काँग्रेससाठी कार्यरत आहे. मात्र पक्ष अमेठीसाठी काहीच करत नाही, ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे. आम्ही आता जागे झालो नाही, तर अमेठीचं भविष्य बदलणार नाही,' असं रशिद म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधी