शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

रांग मोडून मतदान; साक्षी महाराजांच्या मुजोरीमुळे मतदार संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 12:05 IST

रांगेतील मतदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

उन्नव: भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी रांग मोडून मतदान केल्याबद्दल सर्वसामान्य मतदारांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशातल्या उन्नवचे खासदार असलेल्या साक्षी महाराज यांनी मतदान केंद्राबाहेर रांग असतानाही थेट प्रवेश केला. त्यामुळे रांगेत शिस्तीनं उभ्या असलेल्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी आठच्या सुमारास भाजपाचे खासदार साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले. साक्षी महाराज यांना भाजपानं पुन्हा एकदा उन्नवमधून उमेदवारी दिली आहे. साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले, त्यावेळी मतदान केंद्राबाहेर रांग होती. मात्र साक्षी महाराज रांगेत उभे न राहता थेट मतदान केंद्रात शिरले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मतदान करुन निघून गेले. साक्षी महाराजांच्या या मुजोर वृत्तीबद्दल रांगेत उभ्या असलेल्या अनेकांनी संताप व्यक्त केला. साक्षी महाराजांनी रांगेत उभं न राहता थेट मतदान केल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं रांगेत उभ्या असलेल्या काहीजणांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांगेत उभे राहतात. तर मग साक्षी महाराज का उभे राहू शकत नाहीत, असा सवाल एका मतदारानं उपस्थित केला. तर दुसऱ्या मतदारानं रांगेत उभे राहणारे वेडे आहेत का, असा प्रश्न विचारला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019unnao-pcउन्हाओSakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपा