शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: अकोला सोडले नाही; सोलापुरात लढणार- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:40 IST

आज भूमिका जाहीर करणार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी माझी उमेदवारी सोलापुरातून जाहीर केली आहे. मी सोलापुरातून लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे; मात्र मी अकोला सोडलेले नाही, असे स्पष्ट करीत उमेदवारी तसेच महाआघाडीमधील समावेश याबाबत मंगळवार, १२ मार्च रोजी मुंबईत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती भारिप - बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पत्रकार परिषदेत अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीची आहे. आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी तसे जाहीरही केले आहे; मात्र निवडणूक कुठून लढवणार, यासंदर्भात मंगळवारी भूमिका स्पष्ट करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस महाआघाडीमधील समावेशासंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. काँग्रेस आता सहा जागांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत होत असलेली मतांची उभी फूट यापुढे होणार नाही, तर सर्वसमान्य, बहुजन मतांची अन् त्यांच्या विकासाची भूमिका राजकीय पक्षांना मांडावीच लागणार असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला.विदर्भात एकाच टप्प्यात निवडणूक घ्याविदर्भातील सर्वच मतदारसंघाची निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. विदर्भात एकाच टप्प्यात निवडणूक होणे हे प्रशासकीय दृष्ट्याही सोयीचे होईल,अशी भूमिका अ‍ॅड. आंबेडकर यांनी मांडली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSolapurसोलापूरAkolaअकोला