शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 12:20 IST

चौकीदार नरेंद्र मोदींवर अकबरुद्दीन ओवेसींची टीका

हैदराबाद: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय नेत्यांच्या प्रचाराला धार चढू लागली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम हल्लाबोल करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आता चौकीदार शब्दावरुन जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी माझ्याकडे यावं. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन, असा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. सध्या भाजपाचं मै भी चौकीदार कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. मोदींच्या या कॅम्पेनवर वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींनी टीका केली आहे. 'मी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी पाहिलं. त्यांनी त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवरसुद्धा चौकीदार असा उल्लेख करायला हवा. आम्हाला पंतप्रधान हवा आहे. चहावाला, पकोडेवाला नको. मोदींना खरंच चौकीदार होण्यात रस असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देतो,' अशा शब्दांमध्ये ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कोण आहेत, हे मला कळतच नाही, असं अकबरुद्दीन ओवेसी एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले. 'मोदी कधी चहावाला होतात. तर कधी वेगळ्याच रुपात दिसतात. आता निवडणुकीच्या आधी ते चौकीदार झाले आहेत. मोदींनी आधी स्वत:ला चहावाला म्हणवून घेत देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार होऊनही तेच केलं जात आहे. मी चहाची किटली, गॅस देतो. मोदींनी चहा तयार करुन द्यावा, असं आधी मी म्हटलं होतं. त्यावेळी ते स्वत:ला चहावाला म्हणवून घ्यायचे. आता मोदी चौकीदार झालेत. त्यामुळे आता मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. त्यांनी देशाची चौकीदारी करावी,' असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन