शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020: 'त्या' चुका गंभीर, माफ करण्यालायक नाहीत; गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांच्या बदलीमागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 10:39 IST

Anil Deshmukh talk on Parambir Singh transfer: स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे.

अँटिलिया समोर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वाझेंचे निलंबनही करण्यात आले. आता या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असून बुधवारी या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. (CP Office mistakes are not unforgivable; Anil Deshmukh told why action taken on Parambir Singh.)

  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' (Lokmat Maharashtrian of the year award 2020) सोहळ्याला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. त्यांनी मंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीचे कारण सांगितले आहे. पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना मोहरा बनविल्याचे आरोप विरोधक करत आहेत. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच खुलासा केला आहे. सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त यांची बदली ही प्रशासकीय बदली नाही. ती कारवाई आहे. चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या. अक्षम्य अशा त्या गोष्टी आहेत. त्या समजल्याने या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. 

मुंबई पोलिसांचे प्रमुख. पोलीस आयुक्तालाच्या सहकाऱ्यांच्या ज्या गंभीर चुका झाल्या त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत जे समोर येईल त्यावरून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. 

पोलीस दलात चर्चा काय?स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांना आयुक्त पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा गृह विभागात सुरु आहे. पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये अनपेक्षितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगMumbai policeमुंबई पोलीसlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020