शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 20:36 IST

Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर

एमआयएम पक्ष भाजपाची 'बी टीम' असल्याचा आरोप वारंवार केला जातो. बिहार निवडणुकीवेळीही 'एमआयएम'मुळे भाजपला फायदा झाल्याचा दावा केला गेला. याबाबत 'एमआयएम' पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला सडेतोड प्रत्त्युतर दिलं आहे. "बिहार निवडणुकीत ३०० जागांपैकी जर आम्ही २० जागी जरी निवडणूक लढवली नाही. मग कसं चालेल? आमचा राजकीय पक्ष आहे. मग आम्ही काय फक्त भाषणं करायची आणि निवडणूक लढवायची नाही का? आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?", असा टोला इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कार्यक्रमात बोलत होते.

"नाचता येईना अंगण वाकडे अशी एक म्हण आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होतो तिथं कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायला हवं म्हणून एमआयएमला भाजपची बी टीम असल्याचं म्हणायचं आणि जबाबदारी झटकायची. कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचं म्हणून हे असले खोटे आरोप केले जातात. जिथं पराभूत झाले तिथं लगेच काँग्रेसवाल्यांना औवेसी दिसतात आणि त्यामुळं पराभूत झालो असं म्हणतात", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

भाजपला पराभूत करण्यासाठी कुणासोबतही युती करूअमरावतीत शिवसेनेसोबत केलेल्या युतीबाबतही इम्तियाज जलील यांनी यावेळी मोठं भाष्य केलं. "शिवसेनेसोबत आमची युती झालीय किंवा त्यांची विचारसरणाशी आम्ही जुळवून घेतलंय असं नाही. पण प्रत्येक निवडणुकीत काही स्थानिक राजकीय गणितं महत्वाची असतात. त्यात  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आणि देशाला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावतीcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन