शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडी, तरी मुंबईत सर्व जागा लढविण्याची तयारी - भाई जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:48 IST

Bhai Jagtap : जगताप यांनी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्यासमवेत शुक्रवारी विविध महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊन पुष्पांजली वाहिली.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. मुंबईतील प्रत्येक वाॅर्डातील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्व २२७ वाॅर्डांत तयारी करायची असल्याचे नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.जगताप यांनी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्यासमवेत शुक्रवारी विविध महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊन पुष्पांजली वाहिली. तसेच सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्ग्यातील मगदूम शाह बाबांचे दर्शन घेतले. माहीम चर्चमध्येही गेले.माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, थोर महापुरुषांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन अभिवादन केल्यावर नेहमीच प्रेरणा, ऊर्जा मिळते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून कामाची नव्या जोमाने सुरुवात करताना हीच प्रेरणा, ऊर्जा कामी येईल. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हीच ऊर्जा पोहोचवायची आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईतील सर्व २२७ वॉर्डमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्हाला करायचे आहे.मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, हा भावनिक, गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरोगामी महाराष्ट्रात या मुद्द्यावरून तेढ निर्माण करू नये.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेस