शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नायब राज्यपालपदावरून हटवल्यावर किरण बेदी पहिल्यांदाच बोलल्या, मोदी सरकारच्या निर्णयाबाबत म्हणाल्या...

By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 10:27 AM

Kiran Bedi's reaction on her removal from the post of lt Governor of Puducherry :

पुदुच्चेरी - मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घकाळापासून असलेले मतभेद आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना केंद्र सरकारने काल रात्री तडकाफडकी पदावरून हटवले. दरम्यान, मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर किरण बेदी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून किरण बेदी यांनी ऑडिओच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आहे.किरण बेदी ट्विटरवरील या संदेशात म्हणाल्या की, पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानते. तसेच या काळात ज्यांनी माझ्यासोबत काम केले त्या सर्वांचेही मी आभार मानते.टीम राजनिवासने या कार्यकाळात जनतेसाठी काम केले. जे काम झाले ते पवित्र कर्तव्य होते. ज्यामध्ये घटनेद्वारे देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आली. पुदुच्चेरीचे भविष्य खूप चांगले आहे. आता ते येथील जनतेच्या हातात आहे.

मंगळवारी रात्री राष्ट्रपतींनी किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केले होते. तसेच तेलंगणाच्या राज्यपालांकडे पुदुच्चेरीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. किरण बेदी यांची २०१६ मध्ये पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.पुदुच्चेरीमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र या निवडणुकीपूर्वीी सत्ताधारी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काँग्रेसच्या चार आमदारांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे.

टॅग्स :Kiran Bediकिरण बेदीpuducherry-pcपुडुचेरीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार