शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

'खेला होबे' लिहिणाऱ्याचाच झाला 'खेळ'; तृणमूल काँग्रेसनं देबांगशु यांना नाकारलं तिकिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 18:03 IST

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी यांनी सादर केली २९१ उमेदवारांची यादी

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांनी सादर केली २९१ उमेदवारांची यादीतरूण आणि महिलांना अधिक संधी दिल्याचं ममता बॅनर्जींचं वक्तव्य

येत्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी 'खेला होबे' ही सर्वात मोठी घोषणाबाजी ठरली होती. एकीकडे भारतीय जनता पक्षानं याला हिंसा आणि भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असली तरी अनेकांकडून प्रत्येक भाषणात याचा वापर केला जातो. हे इंटरनेटवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. इतकंच काय तर याचं डिजे व्हर्जन आता लग्नसमारंभातही वाजू लागलं आहे. परंतु 'खेला होबे' ही लिहिणाऱे युवा नेते आणि पक्षाचे प्रवक्ते देबांगशु यांना पक्षानं मात्र तिकिट नाकारलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये देबांगशु यांचं नावच नव्हतं.अनेक तरूणांमध्ये लोकप्रिय झालेलं खेला होबे हे गाणं २५ वर्षाच्या सिव्हिल इंजिनिअर आणि तृणमूल काँग्रेसचे युवा नेते देबांगशु भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. स्वत: ममता बॅनर्जी यांनी याचा वापर सुरू केल्यानंतर भाजपच्याही अनेक बड्या नेत्यांनी त्यांना यातच उत्तर दिलं. दरम्यान, देबांगशु यांना हावडामधून तिकिट मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, देबांगशु हे ममता बॅनर्जींचे समर्थक म्हटले जातात. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी २९१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये तरूण, अल्पसंख्यांक, महिला आणि मागासवर्गातील अनेकांना संधी देण्यात आली आहे. तरूणांना संधी"आम्ही यावेळी अधिक तरूण आमि महिला उमेदवारांना संधी दिली आहे. याव्यतिरिक्त २३ ते २४ विद्यमान आमदारांना यावेळी तिकिट देण्यात आलेलं नाही. या यादीत आम्ही जवळपास ५० महिला, ४२ मुस्लीमस ७९ एससी आणि १७ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिली आहे," अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा