शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल, घेतली एवढ्या जागांवर आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:28 IST

Kerala Assembly Election Result 2021 : केरळमध्ये डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे.

तिरुवनंतपूरम - केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांनी जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखली आहे. (Kerala Assembly Election Result 2021 ) दरम्यान, डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. 

डाव्या पक्षांसोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने एलाथूर, कुट्टानाद आणि कोट्टाकल या तीन मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यातील एलाथूर आणि कुट्टानाद येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर कोट्टाकल मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहे. 

एलाथूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ए. के. ससीधरन यांनी आघाडी घेतली आहे. ससीधरन यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत २१ हजार ४६४ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सुल्पिकार मयुरी यांना ११ हजार ७९२ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे टी. पी. जयचंद्रन मास्टर यांना ८ हजार १७२ मते मिळाली आहे. 

तर कुट्टानाद मतदारसंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस के थॉमस हे २० हजार ७६३ मतांसह आघाडीवर आहेत. तर केरळ काँग्रेसचे जेकब अब्राहम १६ हजार ६७१ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. 

कोट्टाकल मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार पिछाडीवर पडला आहे. येथील राष्ट्रवादीचे उमेदवार एन. ए. मोहम्मद कुट्टी पिछाडीवर आहेत. येथे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रा. अब्दुल हुसेन थंगल ३६ हजार ४४३ मतांसह आघाडीवर आहेत. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार