शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kerala assembly Election 2021 :काँग्रेस त्रिमूर्तीला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:48 IST

Kerala assembly Election 2021 :अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे.

- पोपट पवारतिरुवनंतपुरम : अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे.काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी छुपी दावेदारी करणाऱ्या ओमेन चंडी, विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि खासदार मुरलीधरन या तीन नेत्यांच्या एकजुटीसाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना कसरत करावी लागत आहे. प्रचार सभा आणि रोड शोमध्ये या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघात समान वेळ देऊन त्यांच्यात एकवाक्यता राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये गळती लागल्याने डाव्या पक्षांच्या तुलनेत काँग्रेस प्रचारात काहीशी मागे राहिल्याचे चित्र होते. त्यातच माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी स्वत:हून प्रचारात उतरत कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली. एकीकडे कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी करू लागल्याने पक्षनेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. ७६ वर्षे वयाचे ओमेन चंडी हे काँग्रेसचे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून ओखळले जातात. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या मर्जीतील म्हणूनही त्यांची ओळख आहे. दुसरीकडे डाव्या पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढणारे विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांच्याही मनाने या पदासाठी उचल खाल्ली आहे. सोनेतस्करी प्रकरणात डाव्यांना पुरते नामोहरम करून काँग्रेसला उभारी देण्यात चेन्निथला यांचा मोठा वाटा राहिला आहे.  

मुरलीधरनही स्पर्धेत राज्यात पुन्हा सक्रियn    भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नेमम या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रिंगणात उतरलेलेमुरलीधरनही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.n    माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे सुपुत्र असलेले मुरलीधरन हे लोकसभेचे खासदार आहेत. चंडी आणि चेन्निथला यांनीच दोघांत तिसरा नकोचा डाव टाकत मुरलीधरन यांना दिल्लीला पाठविले होते. n    मात्र, विधानसभा निवडणुकीत मुरलीधरन यांनी परत राज्यात येत आपले स्थान मजबूत केले आहे. n    भाजपच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी उमेदवारी करत त्यांना आव्हान दिल्याने पक्षामध्येही त्यांची प्रतिमा उंचावली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१