शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:44 IST

Karunanidhi Death: करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते.

मुंबई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांचे काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, करुणानिधी हे हिंदू असूनही त्यांच्या मृतदेहाचे दहन न करता दफन करण्यात येणार आहे. काय आहे या मागचे कारण...  खरे तर करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते. द्रविड आंदोलनाची विचारसरणी ही ब्राम्हणवादाला उघडउघड विरोध करणारी आहे. तसेच  त्यांनी आखून दिलेले रिती-रिवाजांना न मानणारी आहे. करुणानिधी यांच्या राजकीय प्रवासाची वीट हिंदू जाती व्यवस्था, धार्मिक रुढी आणि सामाजिक भेदभाव याच्या विरोधात रचली गेली होती. ते स्वत:ला नास्तिक असल्याचे सांगत असत. तसेच धार्मिक रुढी आणि अंधश्रद्धांवर प्रखर टीका करायचे. ते द्रविड आंदोलनाचा शेवटचा नास्तिक चेहरा होते. हिंदू धर्मातील रुढींविरोधात बोलने त्यांच्यासाठी नवे नव्हते.   हिंदू धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करताना ते एकदा म्हणाले होते, की हिंदुंचा कोणता धर्म आहे का? हिंदू कोण आहे? जर तुम्ही उजव्या विचारसरणीच्या लोकांना विचारल्यास ते हिंदू धर्माचा अर्थ चोर आहे, असे सांगतिल.  द्रविड आंदोलनाशी जोडला गेलेला नेता आपल्या नावासोबत कधीही जात सांगणारे शब्द वापरत नाहीत. ते हिंदू धर्मातील कोणतेही कर्मकांड मानत नसल्याने त्यांचे मृतदेह दफन केले जातात. या आधीही अनेक द्रविडी नेत्यांचे मृतदेह दफन करण्यात आले आहेत. यामध्ये जयललिता यांचाही समावेश आहे. जयललिता या ब्राम्हण समाजाच्या होत्या. त्यांच्या मृतदेहाचे हिंदू पद्धतीने दहन केले नसले तरीही त्यांच्या नातेवाईकांनी श्रीरंगपट्टनममध्ये बाकीचे अंत्यविधी हिंदू पंरपरेनुसार केले होते. यासाठी त्यांनी मृतदेह म्हणून बाहुलीचा वापर केला होता.  या कारणांमुळेच करुणानिधी यांचा मृतदेह  दहन न करता दफन केला जाणार आहे.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम