शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:41 IST

Kapil Patil News: केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.

- नितिन पंडीतभिवंडी, ( दि. १२ )  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे सोमवारी स्वीकारली. तसेच देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत राज मंत्रालयात पाटील यांनी सोमवारी राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, भाजपाचे प्रदेश सचिव विनोद तावडे उपस्थित होते.

पंचायत राज खात्याच्या माध्यमातून देशातील दोन लाख ७९ हजार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. या योजनेतून गावाचा विकास आराखडा करून त्याची टप्प्या-टप्प्यात अंमलबजावणी केली जाईल. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन स्तरावर विभाजन करून ग्रामीण भागात आदर्श ग्राम योजना राबविली जाईल. त्यातून गावाच्या विकासाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी मंत्री पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ग्राम विकास हा पायलट प्रोजेक्ट काही राज्यात राबविण्यात येईल. ई- ग्रामपंचायत योजनेची अंमलबजावणी करून गावांना आधुनिक विकासाची जोड, स्वयंपूर्ण गावासाठी आधुनिक ग्रामविकासाचा रोड मॅप केला जाणार आहे, असे पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर नमूद केले.

 

स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांनंतर ठाणे जिल्ह्याला प्रथम मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून उल्लेखनीय काम करणार आहे, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलCentral Governmentकेंद्र सरकारbhiwandiभिवंडी