शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण'

By कुणाल गवाणकर | Updated: December 28, 2020 10:28 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचं समन्स; उद्या चौकशी होणार

मुंबई : शिवसेना नेते खासदार  संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९  डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं समजतं. या प्रकरणी संजय राऊत आज दुपारी दोन वाजता शिवसेवा भवनात पत्रकार परिषदेत घेणार आहेत.ED च्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, गाण्यातून व्यक्त केली भावनाथोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. 'मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,' असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरणईडीची नोटीस अन् राऊतांकडून गाण्याच्या ओळी ट्विटशिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ  खडसे यांच्यानंतर आता ईडीने  राऊत यांच्याकडे मोर्चा वळवल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राऊत यांनी ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले... महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात राऊतांची महत्त्वाची भूमिका विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी वातावरण निर्मिती करण्यामध्ये संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर, गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना  ईडीने समन्स बजावल्याने  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उठवली आहे.ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयeknath khadseएकनाथ खडसेpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेना