शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी गेले; गिरीश महाजनांनी नेमके कारण सांगितले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 13:39 IST

जळगाव : दोन दिवस आधी मुक्ताईनगर दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी ...

ठळक मुद्देभाजपतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने नीट बाजू न मांडल्याचा आरोपदेखील यावेळी महाजन यांनी केला.

जळगाव : दोन दिवस आधी मुक्ताईनगर दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. मात्र ही भेट फडणवीस यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

भाजपतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने नीट बाजू न मांडल्याचा आरोपदेखील यावेळी महाजन यांनी केला. त्यामुळे भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी गेले होते. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे तेथे जाणे क्रमप्राप्त होते. तसेच एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात कोणतीही चर्चा आपल्या समोर झालेली नाही आणि यामागे कोणतेही राजकीय संकेत नाहीत.

मनपात भाजप नगरसेवक पुन्हा शिवसेनेत गेल्याच्या मुद्द्यावर बोलताना महाजन यांनी सांगितले की, जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे या उक्तीनुसारच आम्ही काम करत आहोत. सरकार गेल्यावर ज्यांना चिरीमिरी करायची होती ते तेथे गेले. अनेकांवर दबावदेखील टाकण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनPoliticsराजकारणJalgaonजळगाव