शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

Israel Election Result: मोठा पेच! इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू जिंकले, पण बहुमत नाही; अरबांचा 'राम' ठरला किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 09:29 IST

Israel Election Result, Benjamin Netanyahu not get majority: बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत 61 जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. कारण पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाची आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीमध्ये खूप कमी अंतर आहे.

तेल अवीव: इस्त्रायलमध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Israel Election Result) नेहमीप्रमाणे 'कांटे की टक्कर' लागला आहे. या निकालानंतर  'राम' (Raam) नावाचा कट्टर अरब इस्लामिक पक्ष तिथे किंगमेकर बनला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 90 टक्के मतमोजणी झाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) मित्र असलेले बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचा पक्ष लिकुड आणि त्यांच्या मित्रपक्षांना 59 जागा मिळत असल्याचे स्पष्ट झाले. इस्त्त्रायलच्या संसदेत 120 जागा आहेत. बहुमतासाठी नेतन्याहू यांना 61 जागांची गरज आहे. (Prime Minister Benjamin Netanyahu has claimed victory following Israel's fourth election in less than two years, but not winning seats. ) 

बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत 61 जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. कारण पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाची आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीमध्ये खूप कमी अंतर आहे. नेतन्याहूंच्या विरोधकांना 56 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच राम पक्षाला कमीतकमी 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे सत्ता स्थापनेत राम पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राम जर लिकुड पक्षाला समर्थन देत असेल तर नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

नेतन्याहूंचा कट्टर राष्ट्रवाद अडचणीचा...नेतन्याहूंना सत्ता स्थापनेत एकच अडचण आहे. नेतन्याहू हे कट्टर राष्ट्रवादी विचारधारेचे मानले जातात. ते फिलिस्तानींना सूट देणे आणि गाझा पट्टीमध्ये इस्त्रायली कॉलनींच्या विस्ताराला रोखण्याविरोधात आहेत. तर राम पक्षाची विचारधारा ही एकदम उलट आहे. यामुळे हे नेतन्याहूंना राम पक्ष साथ देण्याची शक्यता कमी आहे. 

राम पक्षाने अद्याप कोणाला समर्थन द्यायचे हे ठरविलेले नाही. युनायटेड अरब लिस्ट, ज्याला हिब्रू भाषेत राम म्हटले जाते, हा पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या नेतन्याहूंचे भविष्य ठरविणार आहे. विरोधी पक्षाचे नेते याईल लपिज यांनी संरक्षण मंत्री बेनी गांट्ज यांच्या सहयोगाने गेल्या वर्षी निवडणूक लढविली होती. मात्र, नेतन्याहू आणि गांट्ज यांच्यामध्ये सत्ता समीकरणे बनली आणि ते मागे हटले. आता पुन्हा लपिज यांनी नेतन्याहूंना हरविण्य़ाचा दावा करत प्रचार केला होता. 

राम पक्षाबाबत...राम पक्षा हा इस्त्रायलमधील अरब लोकांचे नेतृत्व करतो. यहुदी बहुल असलेल्या या देशात अरब मुस्लिमांची लोकसंख्या जास्त नाहीय. त्यांच्यातील अनेकजण वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतात. राम पक्षाला पाच जागांवर विजय मिळणे हे पहिल्यांदाच घडले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूElectionनिवडणूक