शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केलेले; खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:58 IST

‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे भान ठेवायला हवे. महाराष्ट्रात आल्यापासून ते घाणेरड्या भाषेत मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. कोण कुठला मुख्यमंत्री, गेला उडत अशी त्यांची विधाने होती. सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसांपूर्वीच केली असती. त्यामुळे त्यांच्यावर आता झालेली कारवाई कायदेशीरच असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. १५ दिवसांपूर्वीच्या विधानांवर त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री म्हणून आदर ठेवला. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासातच नव्हे तर २४ मिनिटे किंवा २४ सेकंदातही अटक होते. गुन्हेगारांना संधी दिल्यास तो पळून जातो, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

राणे यांच्या कारवाई दरम्यान मंत्री अनिल परब यांच्या भूमिकेचेही राऊत यांनी समर्थन केले. परब हे सरकारमधील मंत्री आहेत. ज्या भागात राणेंना अटक केली तिथले पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला त्यात गैर काय असा प्रश्न करतानाच ज्यांची वकिली चालत नाही ते राजकीय सल्ले देत बसतात, अशा शब्दांत राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना सुनावले.

‘मी नेहमी पक्षप्रमुखांना वरचढ मानतोपक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये नेमके कोण वरचढ दिसते, या प्रश्नावर ‘मी नेहमी पक्षप्रमुखांना वरचढ मानतो. ते मुख्यमंत्री आहेत हा योगायोग आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे आजही सर्वोच्च पद आहे, असे राऊत म्हणाले.

तरूण पिढीने नेतृत्व करायला हवे मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे दिले जाणार असल्याबाबतच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, तरूण पिढीने नेतृत्व करायला हवे असेच आम्हाला वाटते. आमच्याशिवाय पक्षात कुणी नाही या भूमिकेत आम्ही कधीच नसतो. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व या महानगरपालिका निवडणुकीत लाभले तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट ठरेल. त्यांचं नेतृत्व झळाळून निघाले तर सगळ्यात जास्त आनंदी मी असेन, असे सांगतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. १५ दिवसांपूर्वीच्या विधानांवर त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री म्हणून आदर ठेवला.  - संजय राऊत, शिवसेना खासदार

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊत