शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"खडसे आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते, आता त्यांनी रिपाइंत यावं", आठवलेंकडून निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 17:17 IST

Eknath Khadase News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे.

ठळक मुद्देएकनाथ खडसेंनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं होतंखडसे आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते. आता तिकडे सारे काही फुल आहेआता खडसेंनी रिपाईंमध्ये यावं, आपण दोघे मिळून आपलं सरकार आणू,

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे. खडसे आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असते तर मंत्री झाले असते, असे विधान आठवले यांनी केले आहे.एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ खडसेंनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं होतं. ते आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते. आता तिकडे सारे काही फुल आहे. आता खडसेंनी रिपाईंमध्ये यावं, आपण दोघे मिळून आपलं सरकार आणू, असे आठवले म्हणाले.दरम्यान, आज सकाळपासून एकनाथ खडसे मुंबईत शरद पवारांना भेटणार असं सांगितलं जातं होतं. याबाबत खुद्द शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसेंबाबत अशी कोणतीही भेट नियोजित नाही, त्यांच्या भेटीबद्दल विनंतीही करण्यात आली नाही, उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आज भेट नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र एकनाथ खडसे आज मुंबईत आहेत, वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आल्याचं खडसेंनी सांगितलं, त्याचसोबत मी लपून छपून कोणाची भेट घेणार नाही, वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला होता.पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ: खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने उडाली होती खळबळखडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी मागणी करीत आहे. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्याने खडसेंशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर हा तरुण नॉट रिचेबल झाला होता.

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस