शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चिपीच्या पहिल्या विमानात मी नक्की असेन, राणेंचे माहीत नाही; शिवसेना नेत्याचा तारखेवरून गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 16:44 IST

Chipi Airport Politics, Narayan Rane: चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीखच ठरली नसल्याचे सिंधुदूर्गचे पालकमंत्री व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

 

 

सावंतवाडी : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरली नाही.त्यामुळे 26 तारीख ही कोणी ठरवली हे मला माहीत नाही.त्यामुळे  उद्घाटनाला कोण येणार हे कसे निश्चित होणार असा सवाल राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.उद् घाटना नंतर पहिल्या विमान उड्डाणात पालकमंत्री म्हणून मी असेनच पण अन्य कोण असतील मला माहीत नाही असा टोला ही मंत्री सामंत यानी राणे यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी सहसंर्पक प्रमूख शैलेश परब  तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर आदि उपस्थीत होते.

मंत्री सामंत म्हणाले,कोरोना टू आल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रिस्क नको म्हणून  अद्याप पर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही याबाबत आपत्कालीन यंत्रणेशी योग्य ती चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

चिपी विमानतळ होणे हा सांघिक प्रयत्न आहे त्यामुळे  उद्घाटनाला सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाईल, हा नको तो नको अशी कोणतीही भूमिका घेतली जाणार नाही. हे काम सांघिक आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन केले जाईल. मात्र उद्घाटनासाठी 26 जानेवारीचा मुहूर्त कोणी काढला हे मात्र माहीत नाही, असे ही त्यांनी सांगितले

मंत्री सामंत म्हणाले, कोरोना टू येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबाबत अद्यापपर्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यापासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना