शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत

By मोरेश्वर येरम | Updated: December 29, 2020 12:33 IST

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीत

ठळक मुद्देचौकशीला उपस्थित राहण्याासाठी ईडीकडे मागितला दोन-तीन दिवसांचा वेळकुणाच्याही धमकीला घाबरणाऱ्यातला मी नाही, राऊत यांनी ठणकावलंपवईतील हॉटेलात संजय राऊतांनी कायदेशीर सल्लागारांशी चर्चा केल्याची माहिती

मुंबई"ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात. मात्र आम्ही शिवसैनिक आहोत. कुणालाही घाबरत नाही. शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार", असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या नोटशीनंतर वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यलयात चौकशीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्या आज चौकशीला जाणार नसून ईडीकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ आम्ही मागितला आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. 

"ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करुन चालत नाही. कायद्यावर कुणाचाही दबाव असला तरी आम्ही  कायदे मानतो. माझ्याकडे लपविण्यासारखं काहीच नाही. ईडीच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देखील देणार आहे. त्यासाठी वकीलांशी बोलून पुढील निर्णय घेणार असून दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

"मला धमकी देणारा जन्माला यायचांय""ईडीच्या नोटीशीने घाबरुन जाणाऱ्यातला मी नाही. माझ्याकडे लपविण्यासारखं काही नाही. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जाते. पण मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही", असा थेट इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

पवईतील हॉटेलमध्ये राऊतांच्या गाठीभेटीमुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर संजय राऊत पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये गेले. याठिकाणी संजय राऊत यांनी कायदेशील सल्ल्यासाठी वकिलांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. पाऊण तासांच्या चर्चेनंतर संजय राऊत हॉटेलमधून बाहेर आले आणि त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई