शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : "योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर..."; मायावतींचा सल्ला

By सायली शिर्के | Updated: October 5, 2020 11:39 IST

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सरकारला महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावरूनच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सरकारला महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील असा सल्ला मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकसंदर्भात ट्विट केलं आहे. 

"हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे 28 सप्टेंबर रोजी सर्वात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास भाग पाडलं" असं मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार हे सर्व अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील" असा सल्ला मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना दिला आहे. 

"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

"योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. मायावती यांनी "केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" असं म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत"

"योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही इतरांच्या बहिणी-मुलींना आपली बहीण-मुलगी समजायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षणकरू शकत नाही तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं. तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत असा माझा 99 टक्के नाही तर 100 टक्के विश्वास आहे. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. हाथरस घटनेनंतर मला अशी आशा होती की दोषींवर उत्तर प्रदेश सरकार कारवाई करण्यासाठी पुढे येईल. मात्र असं काहीही झालेलं नाही. आज सकाळी मी बलरामपूरची आणखी एक घटना बातम्यांत पाहिली जी मला हादरवून टाकणारी होती. राज्यात बहिणी-मुली अजिबात सुरक्षित नाहीत. भाजपा सरकारच्या काळात गुंड, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे" असंही देखील मायावती यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश