शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:13 IST

Uddhav Thackeray Ramesh Bornare : वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर हल्ला चढवला होता. ठाकरेंनी केलेल्या टीकेला रमेश बोरनारेंनी उत्तर देताना गंभीर आरोप केला. 

Maharashtra Vidhan Sabha : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचीवैजापूरमध्ये सभा झाली. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदार रमेश बोरनारे यांच्यावर ठाकरेंनी या सभेतून टीका केली. वैजापुरातील सभेनंतर आमदार बोरनारे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

उद्धव ठाकरेंवर आमदार रमेश बोरनारे यांनीही सभेतून पलटवार केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोप त्यांनी एक किस्सा सांगितला. 

"बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धव ठाकरेंना उलटे टांगले असते"  "४० आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावला आहे. येणाऱ्या निवडणुकीत बोरनारे यांना पराभूत करून उलटे टांगा", असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

त्याला उत्तर देताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले, "काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिले असते, तर त्यांनीच तुम्हाला उलटे टांगले असते." 

मी म्हणालो, "शिवसैनिक आत्महत्या करतील"

बोरनारे यांनी ठाकरेंवर पैसे घेऊन तिकीट देत होते, असा आरोपही केला. "मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र, मी त्यांना भेटून सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेसाठी किती काम केले. मी त्यांना म्हणालो की, "माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही, तर शिवसैनिक आत्महत्या करतील."

"माजी मुख्यमंत्र्‍यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळेच ते एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटले होते की, वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. पण, ते आले आणि टीका करून गेले", असे म्हणत बोरनारे यांनी ठाकरेंना डिवचले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेvaijapur-acवैजापूर