शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठ

By देवेश फडके | Updated: February 23, 2021 17:11 IST

गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Corporation Election 2021 Result) सुरू आहे. एकूण ६ महानगरपालिकांमधील ५७६ वॉर्डांमध्ये मतदान घेण्यात आले. ताज्या कलांनुसार, सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर आहे. सुरत, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून, प्रथमच या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधील महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजयी षटकारMIM कडे मतदारांनी फिरवली पाठसुरतमध्ये आप प्रवेशामुळे काँग्रेसला पत्करावी लागली हार

गांधीनगर :गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Corporation Election 2021 Result) सुरू आहे. एकूण ६ महानगरपालिकांमधील ५७६ वॉर्डांमध्ये मतदान घेण्यात आले. ताज्या कलांनुसार, सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर आहे. सुरत, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून, प्रथमच या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. (gujarat municipal corporation election 2021 result aap defeating congress at surat)

आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सुरत महानगरपालिकेच्या एकूण १२० जागांपैकी भाजप तब्बल ५६ जागांवर विजयी झाला आहे, तर, आपने ९ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार केल्यास काँग्रेसही ८ जागांवर पुढे आहे. सुरतमध्ये आम आदमी पक्षाला पाटीदार समाजामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. 

MIM कडे मतदारांची पाठ

गुजरातमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा फारसा प्रभाव पडलेला पाहायला मिळाला नाही. एकूण २१ जागांवर एमआयएम पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. 

गुजरातमधील महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजयी षटकार, तर काँग्रेसची झाली अशी अवस्था

बसपा तीन जागांवर विजयी

जामनगर महानगरपालिकेत काँग्रेसला मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. तर बहुजन समाजवादी पक्षाने तीन जागांवर विजय मिळवता आलेला नाही. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत.

विजय रुपाणींनी मानले मतदारांचे आभार

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबाबत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. सर्व सहा महानगरपालिकांमधील मतदारांना मी धन्यवाद देतो. भाजप कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास कधी तुटू देणार नाही, असे आश्वासन विजय रुपाणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले.

अमित शहा अहमदाबादला रवाना

गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर केंद्रीय अमित शहा अहमदाबाद येथे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. येथे होणाऱ्या विजयोत्सवात अमित शहा सहभागी होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनElectionनिवडणूक