शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी गुजरात काँग्रेसला हवा ममतांचा ‘हात’, ‘गेहलोत, कमलनाथ यांना प्रभारी करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:11 IST

Gujarat assembly Election: नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्च‍िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासून तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्च‍िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधीलकाँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. गुजरातचे प्रभारी असलेले काँग्रेसचे प्रभारी आणि खा. राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचाही मृत्यू झाला होता. दोन जबाबदार नेत्यांच्या अनुपस्थितीत गुजरात काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत संघर्ष करावा लागू शकतो. ही जागा भरून काढण्यासाठी गेहलोत आणि कमलनाथ यांच्यावर गुजरातची जबाबदारी सोपविली पाहिजे. दोन्ही नेत्यांना यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समितीने याबाबत फार प्रयोग करू नये, गुजरातमधील काँग्रेसच्या एका माजी खासदाराने सांगितले. ममतांमुळे काँग्रेसला बळकटीची अपेक्षागुजरात काँग्रेसचा एक गट ममता बॅनर्जी यांना संपर्क करण्याच्या तयारीत आहे. ममतांचा हात काँग्रेसला मिळाल्यास गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला बळकटी येईल, असे या गटाला वाटते. गांधी परिवाराशी जवळीक असलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले, की ममतांना ते काँग्रेसपासून वेगळे पाहत नाहीत. तसेच ममतांचा गुजरातमध्ये प्रवेश झाल्यास काँग्रेसची जागा घेऊ पाहणाऱ्या आम आदमी पार्टीचेही मनसुबे उधळून लावता येतील. बिहार आणि महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकले जाऊ नये, असे या नेत्यांना वाटते. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसGujaratगुजरातBJPभाजपा