शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

E Rajender: तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:22 IST

E Rajender: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी काही कारणास्तव नाराजी आणि नंतर वाद झाल्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि तेलंगणचे माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत ई. राजेंद्र यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. (former Telangana minister E Rajender joins BJP after quitting as trs mla)

ई. राजेंद्र यांच्याविरोधात काही तक्रारी आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी राजेंद्र यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी लगेचच राजेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. 

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

तेलंगणाच्याराजकारणा महत्त्वाचे स्थान

भाजप पक्षात ई. राजेंद्र यांचे स्वागत करताना केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, तेलंगणच्या राजकारणात ई. राजेंद्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवेल, असा विश्वास प्रधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. हुजुराबाद विधानसभा मतदारसंघातून ई. राजेंद्र आमदार होते. राजेंद्र यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी कमळ हाती घेतले. 

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

दरम्यान, राजेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालकी असलेल्या कंपनीकडून राज्यातील जमिनींवर कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली होती. पक्षाध्यक्षांना भेटून मला राजीनामा द्यायचा होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पक्ष सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला, अशी प्रतिक्रिया ई. राजेंद्र यांनी दिली. अनेकांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मतदारसंघ आणि तेलंगणातील नागरिकांच्या आत्मसन्मानासाठी राजीनामा द्यावा लागला, असे राजेंद्र यांनी नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTelanganaतेलंगणा