शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

“काल रात्री मला फोन आला अन् सांगितलं तुम्हाला भाजपात प्रवेश घ्यायचा आहे, मी म्हणालो...”

By प्रविण मरगळे | Updated: January 14, 2021 13:45 IST

केंद्रात ज्यावेळी  नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा अरविंद शर्मा यांनाही पीएमओ कार्यालयात आले. सध्याच्या घडीला केंद्रीय लघु व अवजड उद्योग खात्यात ते सचिव पदावर कार्यरत होते.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय विश्वसनीय अधिकाऱ्यांच्या यादीत अरविंद कुमार शर्मा यांचे नाव आहे.एके शर्मा यांनी प्राथमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मऊच्या डीएवी इंटर कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.अरविंद शर्मा यांना २०१३ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त प्रमुख सचिव पदी पदोन्नती देण्यात आली

नवी दिल्ली – गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद कुमार शर्मा यांनी लखनौ येथे भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात राहणाऱ्या अरविंद कुमार शर्मा हे २०२२ मध्ये निवृत्त होणार होते. परंतु अचानक स्वैच्छानिवृत्ती घेण्याचा त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांपैकी एक होते, भाजपा त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकतं असं बोललं जात आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर एके शर्मा म्हणाले की, मी मऊ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहतो, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी सांभाळेन, काल रात्री मला फोन आला, तुम्हाला भाजपाचं सदस्य बनवायचं आहे असं त्यांनी सांगितले. मीदेखील त्यासाठी होकार कळवला. अरविंद कुमार शर्मा १९८८ च्या गुजरात कॅडरमधील अधिकारी आहेत. त्यांनी २००१ ते २०१३ पर्यंत गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध पदांवर काम केले होते, केंद्रात ज्यावेळी  नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा अरविंद शर्मा यांनाही पीएमओ कार्यालयात आले. सध्याच्या घडीला केंद्रीय लघु व अवजड उद्योग खात्यात ते सचिव पदावर कार्यरत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय विश्वसनीय अधिकाऱ्यांच्या यादीत अरविंद कुमार शर्मा यांचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मुहम्मदाबाद तहसिलच्या काझाखुर्द गावात ते राहतात. शर्मा यांचा जन्म ११ एप्रिल १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवमूर्ती राय आणि आईचं नाव शांती देवी आहे. एके शर्मा यांनी प्राथमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मऊच्या डीएवी इंटर कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

अरविंद शर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून प्रथम पदवी संपादन केली आणि नंतर राजकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९८८ मध्ये गुजरात कॅडरच्या आयएएस सेवेसाठी त्यांची नियुक्ती झाली, एके शर्मा सुरूवातीला एसडीएम होते त्यानंतर १९८९ मध्ये डीएम बनले, १९९५ मध्ये मेहसाणा आयुक्तपदी निवड झाली, गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात सचिव पदाची जबाबदारी मिळाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भरवसा जिंकण्यात एके शर्मा यशस्वी झाले.

अरविंद शर्मा यांना २०१३ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त प्रमुख सचिव पदी पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये दिल्लीत सत्ता आल्यानंतर जून २०१४ मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर एके शर्मा यांना पंतप्रधान कार्यालयात सहसचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून ते पीएमओ कार्यालयात आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतेवेळी त्यांच्याकडे पीएमओचं अतिरिक्त सचिव पद होते. निवृत्ती घेतल्यानंतर अरविंद कुमार गुरुवारी लखनौ येथे पोहचले आणि दुपारी भाजपात प्रवेश केला. एके शर्मा यांना भाजपा विधान परिषदेवर पाठवू शकते, उत्तर प्रदेशातील राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाईल, कारण पीएमओ कार्यालयात त्यांची पकड मजबूत आहे. योगी मंत्रिमंडळातही शर्मा विशेष जबाबदारी स्वीकारू शकतात.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी