शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 15:32 IST

काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देकमलनाथ यांनी राजकीय सन्यास घेण्याचे दिले संकेतछिंदवाडा या आपल्या बालेकिल्ल्यात एका कार्यक्रमात कमलनाथ यांचं विधानकमलनाथ यांच्या राजकीय सन्यायामुळे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला बसू शकतो मोठा धक्का

छिंदवाडामध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला 'रामराम' करण्याचे संकेत दिले आहेत. 

"मला आता आरामाची गरज आहे. मी आतापर्यंत खूप प्रगती केलीय", असं कमलनाथ म्हणाले. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमलनाथ केवळ राजकीय पद सोडण्याच्या नव्हे, तर राजकारणातूनच सन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ सध्या त्याच्या मुलासह छिंदवाडाच्या दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. 

कमलनाथ हे मध्य प्रदेश विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर काँग्रेसमध्येच कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. चुकीचे तिकीट वाटप, कमकुवत उमेदवार आणि चुकीची रणनिती आखल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. 

आधी सरकार पडलं मग पोटनिवडणुकीतही सपशेल पराभवमध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेरीस ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरुन कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. काही काळाने ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरली आणि काँग्रेसला रामराम ठोकला. 

ज्योतिरादित्य यांच्या जाण्याने मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता गेली. ज्योतिरादित्य समर्थक आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि कमलनाथ सरकार पडलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस