शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

'देशात पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत'; सोनिया गांधी कडाडल्या

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 18:47 IST

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही.

ठळक मुद्देसोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलकृषी कायद्यांवरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावलंपंतप्रधान मोदी भावनाशून्य असल्याची केली टीका

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आलंय की ज्यांना देशाच्या अन्नदात्याचं दु:ख कळत नाही", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे. 

देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. शेतकरी आंदोलक केंद्राच्या जाचक कायद्यांसमोर अजिबात झुकणार नाहीत, असं सोनिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

"अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने गर्विष्ठपणा सोडून तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीविना रद्द करावेत आणि कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हाच खरा राजधर्म ठरेल आणि ज्या शेतकऱ्यांनी यासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल", असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. 

लोकशाही म्हणजे देशातील नागरिकांच्या भावनांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करणे असा होतो, हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं असा खोचक सल्ला देखील सोनिया यांनी यावेळी दिला. 

मोदी सरकार भावनाशून्यकृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर अजूनही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यावरुनही सोनिया यांनी मोदींवर टीका केली. 

"भाजप सरकार असो वा पंतप्रधान मोदी हे भावनाशून्य असून आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. त्यावर चकार शब्द देखील यांनी काढला नाही. शेतकरी आंदोलनात प्राण गमवावा लागलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी आदरांजली वाहते आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती लाभो अशी प्रार्थना करते", असं सोनिया म्हणाल्या.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस