शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 09:01 IST

Farmer Protest: ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत.

गाझियाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही, असा शब्दच देऊन टाकला. 

ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत. यामुळे टिकैत यांना देखील स्फुरन चढले आहे. सरकारची अशी कोणती अडचण आहे की नवीन कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाहीय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकार शेतकऱ्यांना त्यांची बाजू सांगू शकते. आम्ही शेतकरी असे लोक आहोत जे पंचायत राजवर विश्वास ठेवतो. आम्ही कधी जगासमोर सरकारची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही. सरकारसोबत आमची वैचारिक लढाई आहे. ही लढाई लाठ्या, काठ्या, बंदुकांनी लढली जाऊ शकत नाही. नाही त्याद्वारे दाबली जाऊ शकते. जेव्हा नवीन कायदे मागे घेतले जातील तेव्हाच आम्ही शेतकरी आपल्या घरी परत जाऊ, असेही टिकैत यांनी सांगितले. 

मोदी सरकार अखेर नरमले! कृषी कायद्यांवर विरोधकांना दिले मोठे आश्वासनशेतकरी आंदोलनाच्या छायेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. कृषी कायद्यांवर मोदी सरकारने चर्चाच केली नाही, विरोध पक्षांना महत्व दिले नाही असा आरोप या नेत्यांनी केला होता. आता यावर मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. यामुळे मोदी सरकारकडून कृषी कायद्यांवर अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता. यामुळे अधिवेशनात कोणताही गोंधळ नको म्हणून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. 

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?

 26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसेवरून गाझियाबाद सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन संपविण्याची तयारी करत होते. मात्र, अचानक आमदार महोदय आंदोलनस्थळी पोहोचले आणि सारा खेळच बिघडवून टाकला. टिकैत यांनी त्या आमदारांवरही सरकारसोबत मिळून कट रचत असल्याचा आरोप केला आहे. भारतीय किसान युनियनने आमदार नंद किशोर गुर्जर आणि साहिदाबादचे आमदार सुनिल वर्मावर शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्याचे आरोप केले आहेत. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोनीचे आमदार आहेत. सुत्रांनी सांगितले की, राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा योग्य दिशेने जात होता. टिकैत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. अचानक सारा खेळ बिघडला. भाजपा आमदार गुर्जर त्यांच्या 100 हून अधिक समर्थकांना घेऊन आंदोलनात घुसले. यामुळे टिकैत यांनी अधिकाऱ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडली आणि थेट मंचावर जाऊन उभे राहिले. टिकैत यांनी असेच आरोप सुनिल शर्मा यांच्यावर लावले आहेत. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी