शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

"लबाड लांडगं ढोंग करतंय, मतं मागण्यासाठी सोंग करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:33 IST

गीतेंनी प्रकाशित केलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तळा : गीतेंनी प्रकाशित केलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेण तालुक्यातील झोतिरपाडा गावामध्ये समाज मंदिर बांधल्याचा त्यात उल्लेख केला गेला आहे. गावातील एका युवकाने अशा प्रकारचे समाज मंदिर गावात कुठेच नाही. समाज मंदिर चोरीस गेल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी लागली आहे असे सांगत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या शैलीत अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतला. पक्ष प्रमुखांच्या जाहीर सभेत कोकणच्या विकासासाठी काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे हे सांगण्याऐवजी जनतेसमोर लोटांगण घातलेले मंत्री त्यावर मला दादा कोंडके यांचं एक गीत आठवलं लबाड लांडगं ढोंग करतंय आणि मतं मागण्याचं सोंग करतंय असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर प्रचार सभा रविवारी तळा आणि कुडे येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

खारपाड तेथे साडेतीन लाख रु.खर्चून गटार बांधण्यात आल्याचे या पुस्तिकेत दाखविण्यात आले आहे. पेण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दयानंद भगत यांच्या पत्नी येथे सरपंच आहेत ते अजून हे नवीन बांधलेलं गटार शोधत आहेत. गुहागर येथे आ.भास्कर जाधव यांनी केलेली कामे या पुस्तकात छापण्यात आली आहेत. म्हणूनच मी सातत्याने म्हणतोय गीते साहेबांचे काम दाखवा दोन हजार मिळवा, असे तटकरे म्हणाले. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलेल्या उद्धव ठाकरेंनी शेवटी त्यांच्याशीच युती केली. ही युती जनतेच्या हितासाठी असे हे सांगतात तर गेली पाच वर्षे एकमेकांवर कुरघोड्या करण्यात का वाया घालवली? सत्तेत आल्यापासून शिवसेनेने स्वत: ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारवर टीका केली. निवडणुका आल्या की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन असं खा. गीते म्हणाले होते, मात्र आज त्यांची एवढी प्रचाराची भाषणं होत आहेत, त्यांनी एकदाही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत.या सभेला काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजिप सदस्य अस्लम राऊत, माणगाव शेकाप चिटणीस रमेश मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>‘२३ मेला वाघाची शिकार करणार’हेच गीते मला विषारी साप म्हणाले होते, पण गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे साक्षीदार इथले लोक आहेत, त्यांनी मला घडवलं आहे. राजकारणात कधी साधा डासही मारला नाही, मात्र यावेळी २३ मेला मी वाघाची शिकार करणार आहे, असे खुले आव्हान त्यांनी गीतेंना केले.मागच्या वेळी माझ्या विरोधात एक सुनील तटकरे उभा केला होता, यावेळी दोन केले आहेत, एक काय दहा सुनील तटकरे उभे केले, कितीही डाव खेळलात तरी लोक यावेळी फसणार नाहीत. मी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करीत आहेत माझ्यावर केस दाखल आहे असे म्हणतात, मग माझ्या नामनिर्देशन अर्जात हरकत का घेतली नाही.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीते