शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या मतांवर डोळा, समस्यांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:43 IST

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नाही, होय करत अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

- दीपक शिंदेसातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नाही, होय करत अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना शांत करत अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि सर्वांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. मूळचे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य असलेल्या नरेंद्र पाटील यांनी निवडणुकीच्या दोन महिने अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर, दुसऱ्या पक्षाचे कोणी का असेना मी लढणारच, या अविर्भावात त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघात तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मिसळ खाल्ली होती. मात्र, लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने ते शिवसेनेत गेले. त्यांनी दोन महिन्यांत दोन पक्ष बदलले आणि अखेर शिवसेनेची उमेदवारी मिळविली.सध्याच्या स्थितीत दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. बेरोजगारी, उद्योग, पायाभूत सुविधा असे मुद्दे उमेदवारांच्या प्रचारात येत आहेत, पण दुष्काळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजत घोंगडे याबाबत उमेदवार चकार शब्द काढत नाहीत. त्यांना जिल्ह्याचे प्रश्न कळताहेत की जाणीवपूर्वक टाळताहेत, असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे माथाडी कामगारांच्या मतासाठी दोन्ही उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्याबरोबरच स्थानिक प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. नरेंद्र पाटील उदयनराजेंवर टीका करीत आहेत, पण त्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचा आणि समस्यांचाही आढावा कधी घेणार, असा सवाल लोक करीत आहेत.राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना निवडणुकीसाठी पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश दिले आहेत, पण एखाद दुसरा आमदार वगळता फार कोणी प्रचारात दिसत नाही. एका बाजूला कोरेगावचे आमदार आणि दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसाठी खिंड लढवत आहेत. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते नरेंद्र पाटलांच्या प्रचारासाठी सभा आणि बैठकांवर जोर देऊ लागले आहेत.पाटील यांच्या एंट्रीने लढतीत रंगत आली आहे. उदयनराजेंसाठी निवडणूक आता तेवढी सोपी राहिलेली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसातारा