शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

Exit Poll : ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा झटका; कमलनाथांनी गड फोडला?

By हेमंत बावकर | Updated: November 7, 2020 21:27 IST

Byelection Madhya Pradesh: ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली.

बिहार विधानसभा निवडणुकीबरोबर मध्य प्रदेशमध्येही 28 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागांवर 355 उमेदवार उभे राहिले होते. यापैकी सर्वच जागांवर काँग्रेस विरोधात भाजप अशीच लढाई पहायला मिळाली आहे. मतमोजनी 10 नोव्हेंबरला होणार असून इंडिया-टुडे अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपाची शिवराज सिंह चौहान यांचे सरकार सुरक्षित आहे. मात्र. शिंदे सरकार धोक्यात आले आहेत. 

ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिंदे यांच्यासमोर भाजपात प्रस्थ वाढविण्याचे आव्हान पेलावे लागले. तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचे शल्य कमलनाथ यांच्या उराशी होते. यामुळे प्रामुख्याने हे मतदारसंघ शिंदे यांचा गड असल्याने शिंदे विरोधात कमलनाथ अशीच लढाई रंगली होती. आज या पोटनिवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. 

या पोलनुसार ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. 28 पैकी भाजपाला 16 ते 18 जागा आणि काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात ज्या आमदारांनी बंड केले त्यांना मोठा झटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे बंडखोर माजी आमदार पडल्यास त्याचा थेट फटका शिंदे यांनाही बसणार आहे. कारण समर्थक आमदार कमी झाल्याने मंत्रिपदेही त्या तुलनेत कमी मिळणार आहेत. यामुळे भाजपाच्या मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ आमदारांचे चेहरे खुलले आहेत. 

काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या 25 आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी 14 जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ 8 जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला 28 पैकी 28 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे. 

शिंदे साईडलाईनप्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. अखेर निवडणुकीत  ‘भाजपा है तो विश्वास है’ चा नारा देण्यात येऊ लागला, हा नारा पुढे बदलून 'शिवराज है तो विश्वास है' असा झाला होता. या गोष्टींचा परिणाम पोटनिवडणुकीतच नाही तर पुढील 2023 मधील निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस