शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll 2021: पश्चिम बंगालमध्ये 'धाकधुक' वाढली; पाहा, पाच राज्यांचे 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:49 IST

West Bengal, Assam, Kerala, Tamilnadu Exit Poll 2021: टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल.

ठळक मुद्देसी वोटर नुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला १५२-१६४ जागा मिळतील. तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मागील अनेक निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणे दर ५ वर्षांनी सरकार बदलते. पण यंदा डावे डेमोक्रिटिक फ्रंट या ट्रेंडला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात. CNX एक्झिट पोलप्रमाणे डीएमके आघाडीला १६५ तर सत्ताधारी एआयडीएमके यांना केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागेल.

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल आले आहेत. या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी घोषित होतील. टाईम्स नाऊ सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपात अटीतटीची लढत आहे. परंतु ममता बँनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याची भविष्यवाणी केली जात आहे. तर इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल. 

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा एल्गार टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. सी वोटर नुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला १५२-१६४ जागा मिळतील. तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना १४-२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ५ राज्यांच्या एकूण ८२२ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या आहेत. बंगालमध्ये २ जागांवर उमेदवारांच्या मृत्यूमुळे मतदान बंद पडलं. 

बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार – रिपब्लिक सीएनएक्सदरम्यान, रिपब्लिक-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाला १३८-१४८ जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. तर टीएमसीला १२६-१३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला ६-९ जागांवरच समाधान मानावे लागेल तर इतरांना १-३ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. 

आसाममध्ये भाजपा सत्ता राखणारआसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी मतदान झाले. याठिकाणी बहुमतासाठी ६३ जागांची गरज आहे. इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार १२६ जागांच्या आसाममध्ये भाजपा आघाडी पुन्हा सत्तेत येईल. भाजपा आघाडीला ७५-८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ४०-५० जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यात १-४ जागा जाण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये पुन्हा एकदा डावे सरकार?केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार याठिकाणी डावे पुन्हा एकदा सरकार बनवण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणे दर ५ वर्षांनी सरकार बदलते. पण यंदा डावे डेमोक्रिटिक फ्रंट या ट्रेंडला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात. त्यांना ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ६१ जागांवर विजय मिळू शकतो. भाजपाला केरळमध्ये अवघ्या ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये स्टालिन सरकार?तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत यंदा सत्ता परिवर्तन होऊ शकते. डिएमकेला जबरदस्त यश मिळताना दिसत आहे. CNX एक्झिट पोलप्रमाणे डीएमके आघाडीला १६५ तर सत्ताधारी एआयडीएमके यांना केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागेल. तर इतरांना ६ जागा मिळू शकतात.

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021