सरपंचपद लिलावाची आयोगाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:36 AM2021-01-05T06:36:29+5:302021-01-05T06:36:44+5:30

Gram panchayat Election: अहवाल द्या; निवडणूक आयुक्तांचे निर्देश

Election Commission takes note of Sarpanchpad auction | सरपंचपद लिलावाची आयोगाने घेतली दखल

सरपंचपद लिलावाची आयोगाने घेतली दखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई  : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून काही ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड करत सरपंचपदासाठी लिलाव करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.


 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी काही ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्यास त्यास बिनविरोध विजयी घोषित करण्यात येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अन्य उमेदवारांवर दबाव टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रसंग टाळण्यासाठी आयोगास तत्काळ त्याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्यात यावा व राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच संबंधित उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करावे, असे निवडणूक आयोगाचे  पूर्वीपासूनच आदेश आहेत. त्यासोबतच आता सरपंचपदाच्या लिलावाच्या घटना घडल्या असल्यास त्याबाबतही स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मदान यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीसाठी बाधक
राज्यात काही ठिकाणी सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशा तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे.  

Web Title: Election Commission takes note of Sarpanchpad auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.